आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप पाठकने बनवले केळीचे कुरकुरीत वेफर्स:श्रीरामपूर मार्गावर विसावा घेत संदीपने चाखली केळीच्या वेफर्सची चव, व्हिडिओ केला शेअर

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​अभिनेता संदीप पाठक सध्या त्याच्या आगामी 'आपडी थापडी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच तो श्रीरामपूर ते मुंबई असा प्रवास करत होता. यावेळी श्रीरामपूर ते लोणी या मार्गावर थोडासा विसावा घेत त्याने संजू लोहार नावाच्या माणसाच्या कुरकुरीत केळी वेफर्सच्या दुकानाला भेट दिली. अगदी ताज्या केळींपासून संजू वेफर्स बनवत असतात. यावेळी संदीपला स्वतःला देखील वेफर्स बनवण्याचा आणि ते चाखण्याचा मोह आवरता आला नाही. मग त्यानेही हातात झारी घेऊन स्वतः वेफर्स तळले. संदीपने स्वतः सोशल मीडियावर हा खास व्हिडिओ शेअर करत या ठिकाणाला भेट देण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. तुम्हीही बघा संदीपने शेअर केलेला खास व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...