आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख म्हणजे नक्की काय असंत:आता 'ही' अभिनेत्री साकारणार देवकीची भूमिका, जाणून घ्या का झाला आहे मालिकेत मोठा बदल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री भक्ती रत्नपारखी देवकीचे पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे

सध्या छोट्या पडद्यावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका खूप गाजतेय. या मालिकेतील गौरी, शालिनी, जयदीप या सर्व पात्रांसोबत देवकी हे पात्रही प्रेक्षकांच्या खास पसंतीचे आहे. मात्र आता देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड या मालिकेतून ब्रेक घेत आहे. तिच्याजागी आता नवीन अभिनेत्री हे पात्र वठवताना दिसणार आहे. अभिनेत्री भक्ती रत्नपारखी देवकीचे पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे.

लवकरच आई होणार आहे मीनाक्षी
अभिनेत्री मीनाक्षी राठोड लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ती काही काळासाठी कामापासून ब्रेक घेणार आहे. प्रेग्नेंसीच्या काळातही तिने मालिकेचे चित्रीकरण सुरु ठेवले होते. पण आता तिची प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिने मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच मीनाक्षीने तिचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

शिवाय काही दिवसांपूर्वीच तिचा डोहाळे जेवणाचाही कार्यक्रम पार पडला होता.

आता भक्ती साकारणार देवकीचे पात्र
शालिनीच्या कटकारस्थानात तिला साथ देणारी देवकी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मीनाक्षीने वेगळ्या उंचीवर नेलेले हे पात्र आता भक्ती रत्नपारखी साकारणार आहे. भक्तीने यापूर्वी 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत मॅडी हे पात्र साकारले होते.

प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे भक्ती
भक्ती रत्नपारखी हिने 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेपुर्वी अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रिअॅलिटी शोमधून ती घराघरांत पोहोचली आहे. याशिवाय तिने 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

खासगी आयुष्यात भक्ती विवाहित असून तिचे पती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. निखिल रत्नपारखी हे भक्तीच्या पतीचे नाव आहे. निखिल यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत. निखिल यांनी ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई कि लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीतसुद्धा काम केलेले आहे.

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव आहे भक्ती...

'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत अल्लड आणि खोडसाळ दिसलेली मॅडी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड सुंदर दिसते. भक्ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते.

बातम्या आणखी आहेत...