आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी 3 – दिवस एकोणिसावा:'त्याची सत्ता आणण्यासाठी तो विशालचा वापर करतो आहे', उत्कर्ष शिंदे भरतोय विकासचे कान

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणापासून विशालला सावध रहायला पाहिजे असे उत्कर्ष विकास सांगत असेल ? आजच्या भागामध्ये कळेलच.

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये उत्कर्ष, जय, गायत्री, मीरा विकासला काही तरी सांगू इच्छित आहेत. विकास आज उत्कर्षकडे मत मागयला जाणार आहे. त्यावर उत्कर्ष त्याला म्हणतोय की, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्ही सगळे तुझ्या बाजूने उभे राहू, पण तो म्हणजेच आदिश विशालचा वापर करून घेतोय.

उत्कर्ष पुढे विकासला सांगतोय, 'विशालचा फक्त चेहरा आहे आणि मागे तो (आदिश) आहे. तो त्याची सत्ता आणण्यासाठी विशालचा वापर करतो आहे. विशाल भोळा आहे, तो विशालचा वापर करतो आहे. विशाल वाटतं आहे मी कॅप्टन होतो आहे ना बसं मग. त्याला हे कळत नाहीये तो त्याचा वापर करून त्याला फेकून देणार, मग काय फायदा ? आज विशाल आहे उद्या तो कोणाचा पण वापर करेल फायदा काय... ते पण आल्या आल्या.' आता अधिक मतं मिळून कॅप्टन कोण होणार हे येत्या भागात कळेल.

बातम्या आणखी आहेत...