आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी चौथा दिवस:सोनाली पाटील करणार गायत्री दातारची नक्कल,  घराच रंगणार जबरदस्त कार्यक्रम 'दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातला माहोल एकदम हलकाफुलका होताना दिसणार आहे

बिग बॉस मराठीच्या घरात दर दिवशी नाही दर मिनिटाला नाही तर सेंकदाला स्ट्रॅटेजि बदलत असतात. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगण खूप कठीण असतं.

प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजी आखताना दिसणार आहेत. आता तो नक्की कोणाबद्दल आहे ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.

दुसरीकडे सोनाली गायत्री दातारची नक्कल करताना दिसणार आहे. घरातील सदस्यांना 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड' हा टास्क घेण्यात आला होता. त्यात गायत्री सोनालीकडे तिचे मत मागण्यासाठी आली होती. परंतु, सोनालीने अक्षय वाघमारेचे नाव घेताच गायत्री सोनालीला सुनावत निघून गेली. हा संपूर्ण प्रसंग सोनाली मीनल शाहला सांगताना दिसणार आहे. यावेळी सोनालीने हुबेहुब गायत्रीची नक्कल करताना दिसेल.

घरात रंगणार दादुस ऑर्केस्ट्रा
दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला हा कार्यक्रम घरात रंगणार आहे. उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप परिधान केला आहे.

दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला या कार्यक्रमात विकास पाटील 'हृदयी वसंत फुलताना' या गाण्यावर मीनल शाह सोबत नृत्य सादर करणार आहे तर उत्कर्ष शिंदे सुरेखा कुडची यांच्यासोबत 'ही पोरगी साजूक तुपातली' या गाण्यावर धम्माल डान्स करणार आहे. यांना साथ मिळणार आहे दादुस (संतोष चौधरी) यांची. घरातला माहोल एकदम हलकाफुलका होताना दिसणार आहे

बातम्या आणखी आहेत...