आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी – दिवस पाचवा:फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये रंगणार जुगलबंदी, मीरा आणि जयमध्ये होणार जोरदार भांडण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीरा आणि उत्कर्ष शक्तिपदक मिळविण्याच्या उमेदवारीचे मानकरी ठरले.

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यातील उपकार्ये काल संपली. उत्कर्ष शिंदे या पहिल्या साप्ताहिक कार्यातील दोन उपकार्य जिंकून त्याचा पहिला विजेता ठरला. उत्कर्षला विशेष अधिकार देण्यात आला ज्यामध्ये त्याला एका महिला सदस्याची सहविजेती निवड करायला सांगितली आणि उत्कर्षने मीरा जगन्नाथ हिची निवड केली. त्यामुळेच मीरा आणि उत्कर्ष शक्तिपदक मिळविण्याच्या उमेदवारीचे मानकरी ठरले.

शक्तिपदक जिंकणारा सदस्य एका नव्या अध्यायाशी जोडला जाणार आहे. आता या दोघांमध्ये हे पदक मिळण्यासाठी एक सामना रंगणार आहे. हे कार्य फक्त Temptation Room साठी नसून बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील पहिले कॅप्टनपद मिळवण्याच्या बहुमानासाठी देखील असणार आहे. जो सदस्य कार्यात विजेता ठरेल त्या सदस्याला Temptation Room आणि कॅप्टनपद यामध्ये निवड करावी लागणार आहे. कालपासूनच घरामध्ये खेळ फाशाचा सुरू झाला आहे. फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये जुगलबंदी रंगली.

स्पर्धकांना दिसली Temptation Room ची झलक
बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राइज मिळालं. बिग बॉस मराठीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉस यांनी सदस्यांना Temptation Room ची पहिली झलक दाखवली. या Temptation Room मध्ये असणार आहेत सदस्यांसाठी बरीच सरप्राइजेस आणि Temptations.

या रूममध्ये फोनबूथ असणार आहे, ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील. तसेच खाण्याचे विविध पदार्थदेखील असणार आहेत, जे बिग बॉसच्या घरात सदस्यांसाठी उपलब्ध नसतात. शिवाय बायोस्कोपदेखील असणार आहे, ज्यामधून सदस्य घराच्या आत डोकावू शकतील.

दरम्यान मीरा आणि जयमध्ये जोरदार भांडण होणार आहे. जर ही जुडो कराटे खेळली तर मी नॅशनल लेवल प्लेयर आहे मी स्विमिंग पूल मध्ये टाकून देईन, असे जय म्हणताना दिसणार आहे. यावर विकास त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

या खेळात कोण जिंकणार? कोण तिसर्‍या पर्वाचा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवणार? की Temptation Room ची निवड करणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...