आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस मराठी सीझन 3 ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली. स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती आणि रविवारी संध्या सात वाजता या सगळ्यावरून पडदा उघडला गेला. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एंट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली.
स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एंट्री झाली. याशिवाय तरुण कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची देखील एंट्री झाली.
सोनाली पाटीलची बिग बॉस मराठी सीझन 3 च्या घरात पहिली एंट्री झाली आणि त्यानंतर एक एक करून 14 सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले. बिग बॉस मराठीचे अलिशान घर बघून सगळेच अवाक् झाले.
पहिल्याच दिवशी उडाली वादाची ठिणगी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी मीरा आणि जयमध्ये भांडण झालेले बघायला मिळणार आहे. तसेच मीरा आणि स्नेहामध्ये बाचाबाचीदेखील होणार आहे.
मीराने जयला सुनावले “जय मला डोक आहे”. तर स्नेहाने मिराला खडसावले, “ही काय पध्दत आहे का बोलायची” ?
घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो सगळेच चर्चेत असणार आहे.
मीरा आणि स्नेहा तसेच मीरा आणि जय याच्यात वाद कशावरून झाला ? पुढे काय झाले ? हे आजच्या भागामध्ये कळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.