आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी – दिवस दहावा:जय आणि गायत्री यांच्यापैकी एक होणार कॅप्टन, गायत्री म्हणते - 'मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही'

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण घराचा नवा कॅप्टन बनणार ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आज “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य रंगणार असून घराला दुसरा कॅप्टन मिळणार आहे. जय आणि गायत्री या दोघांमध्ये एक घराचा कॅप्टन बनणार आहे. घरातील नाती दर दिवसाला बदलताना दिसत आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगता येत नाही. आजच्या होणार्‍या टास्कबद्दल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्‍याच चर्चांना उधाण आल्याच दिसून येत आहे. प्रत्येकजण आपला मुद्दा दुसर्‍याला पटवण्यात गुंग आहे. सदस्य नक्की कोणाच्या बाजूने उभे रहाणार ? कोणाला घराचा नवा कॅप्टन बनवणार ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहेच.

याचविषयी आज विशाल आणि गायत्रीमध्ये चर्चा रंगणार आहे. विशाल गायत्रीला विचारताना दिसणार आहे, “तुझं काय मत आहे. ज्या ज्या गोष्टी झाल्या खेळात... तुझ्यावर अन्याय झाला, तुमचीच लोकं... हे झालं नाही पाहिजे. मला नाही वाटतं माझी कुणाला मत द्यायची इच्छा नाहीये. जय तर आलाच नाही माझ्याकडे मत मागायला तर तो विषयच संपला. मला स्वत:चा निर्णय घेऊ दे! जो काही असेल तो तुला दिसेल.'

गायत्री विशालला सांगणार आहे, “माझ्यावर विश्वास ठेव, मला इतकचं सांगायच आहे की, मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही”.

याशिवाय गायत्री विकासला सांगणार आहे, “जर मी कॅप्टन बनले तर जयपेक्षा जास्त निष्पक्ष राहू शकते. जयपेक्षा जास्त शांतत मी ठेऊ शकते. टास्कच्या वेळी होणारा आरडाओरडा आणि मारामारी होणार नाही, आणि फेरप्ले मी करू शकते असं मला वाटतं. जर तू मला पाठिंबा दिलास, तर मला वाटतं ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल. जे काही घडलं त्याच्यानंतर ही एक चांगली सुरुवात असेल. माझ्या डोक्यात काही नाही तुझ्या डोक्यात काही नाही”.

बातम्या आणखी आहेत...