आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी 3 – दिवस सोळावा:आदिश वैद्य स्वीकारणार पॉवर कार्ड, दुसरीकडे सोनालीला अश्रु अनावर !

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉस आदिशला एक कठीण असे कार्य सोपवणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री घरामध्ये झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावा लागले. तर बिग बॉस मराठीमध्ये काल झाली सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री. आदिश वैद्यचा काल धमाकेदार परफॉर्मन्स झाला. आज आदिश घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहेत.

बिग बॉस आदिशला बहुमूल्य temptation स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहेत आणि ते temptation आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. ज्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे temptation स्वीकारल्यास परिणाम स्वरूप या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे. आदिशने पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे.

दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक सदस्यांना भावुक होताना बघितले आहे. कधी दुसर्‍यांच्या वाईट बोलण्याने तर कधी घराच्यांच्या आठवणीने तर कधी घरातल्याच एखाद्या जवळच्या सदस्याच्या वागणुकीमुळे. तसंच काहीसं सोनालीसोबत आज झालं आहे. मीनलच्या वागणुकीमुळे सोनाली आणि विकास दुखावले आहेत. सोनालीला याच कारणामुळे अश्रु अनावर झाले आणि ती विशालसमोर मन मोकळं करताना दिसणार आहे. नेमके सोनालीला का रडू कोसळले, हे आजच्या भागात प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...