आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी सीझन 3 चा दुसरा दिवस:'नकळत सारे घडले'च्या सेटवर सुरेखा कुडचींनी फेकली होती मीराची बॅग, त्या दिवसांची आठवण काढत मीरा म्हणाली - 'मला वाटलं तुम्ही इथे पण तशाच वागणार'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा दिवस कसा राहिला?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. मीरा आज त्यांना हेच सांगताना दिसणार आहे.

सुरेखा कुडची यांना मीरा म्हणाली, “तिकडे आपलं काहीतरी झालं होतं”, सुरेखा कुडची म्हणाल्या काय झालं होतं माझ्यासाठी रात गई बात गई... त्यावर मीरा पुढे म्हणाली, “जेव्हा मी तुम्हाला घरात पहिलं तेव्हा माझं असं झालं, बापरे या इथे पण अशाच वागणार की काय? मी गायत्रीला देखील बोलले, यांच्या वाईब्स खूप भारी वाटत आहेत. मी जो विचार केला होता ना तुम्हाला बघून तशा तुम्ही नाहीच आहात किंवा मग बाहेर वेगळं आणि इथे वेगळे वागत आहोत आपण असंही झालं माझं”.

त्यावर सुरेखा यांनी विचारले तिथे काय झालं होतं त्यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकली होती”. हे ऐकून त्यांना देखील धक्का बसला. यापुढे काय झालं? बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा दिवस कसा राहिला? हे प्रेक्षकांना आजच्या भागात बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...