आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्या जवळच्या माणसांची, घरच्यांची आठवण येणं अगदी सहाजिक आहे. सोनाली पाटील आज शिवलीला यांच्याशी बोलताना, आठवणी सांगताना भावुक होताना दिसणार आहे. सोनाली शिवलीला यांना तिच्या वडिलांबाबतीत काही आठवणी सांगणार आहे.
सोनाली म्हणाली, “माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम आठवला. माझी मालिका सुरू असतानाच पप्पा वारले. त्यांनी माझी मालिका वैजू बघितलीच नाही. कुठलचं कारण नाही, अचानक एखादा माणूस तुम्हाला सोडून जातो... त्याचंच वाईट वाटतं.'
शिवलीला यांनी तिची समजूत काढली म्हणाल्या, 'म्हणजे तुझा प्रवास सुरू झालेला नाही बघितला. तुला असं वाटत आहे त्यांनी पाहिलं नाही, पण तुला हे देखील माहिती आहे की ते बघत आहेत... आणि ते आता जिथे असतील ते खुश असतील, आता तू बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहेस. तू वाईट वाटून नको घेऊस, तुला अभिमान वाटला पाहिजे.'
पुन्हा एकदा कालच्या मुद्द्यावरून मीरा आणि स्नेहामध्ये मोठ भांडण होणार आहे.
मीराला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आला आहे ? त्यामध्ये नक्की घडणार ? कोणाची बाजू कोण घेणार ? स्नेहा तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना बघता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.