आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी 3 – दिवस विसावा:कॅप्टन्सी टास्क दरम्यान बिग बॉस मराठीचं घर बनलं कुस्तीचा आखाडा, सुरेखा कुडची, स्नेहा वाघ आणि विशाल निकमपैकी कोण होणार कॅप्टन !

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघूया कोणाची रणनीती यशस्वी ठरते.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य “BB College” या थीम अंतर्गत सुरू होते. ज्यामध्ये घरामधील काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य प्राध्यापक बनले होते. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहिर केले आता वेळ आली आहे घराचा नवा कॅप्टन निवडण्याची आणि सदस्य टास्क मध्ये गुंग झाले. पण टास्क करताना सदस्य भान हरपून जातात. दोन नावं घरात घुमत होती जय, विशाल. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? आज कळेलच.

योग्य तो विचार करूनच सदस्य हा टास्क पार पाडतील अशीच इच्छा आहे म्हणजे या आठवड्यात घराला नवा कॅप्टन मिळेल. बघूया कोणाची रणनीती यशस्वी ठरते.

या कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी असणार आहेत तीन सदस्य सुरेखा कुडची, स्नेहा वाघ आणि विशाल निकम. टास्कमध्ये भांडण, आवाज चढण, एकमेकांना बोलणं हे चालूच असतं... बघुया आज कोण कोणती युक्ती वापरुन हा टास्क खेळेल? आणि कोण बनेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवा कॅप्टन.

बातम्या आणखी आहेत...