आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी तिसरा दिवस:'या' कारणामुळे शिवलीलाला अश्रु अनावर, म्हणाली....

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज शिवलीला घरामध्ये थोडीशी भाऊक होताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहिक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष. मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला.

आज शिवलीला घरामध्ये थोडीशी भाऊक होताना दिसणार आहे. ती म्हणते, “आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”. त्यावर मीनलने तिला समजावले “तू खूप छान वागते आहेस. चांगलं खेळते आहेस. तुझी मत क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत. विशाल निकम देखील म्हणाला “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.

बातम्या आणखी आहेत...