आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटात दिसणार नवी जोडी:'बिग बॉस 15'ची विजेती तेजस्वी प्रकाश अभिनय बेर्डेसोबत पडद्यावर करणार रोमान्स, 'हा' आहे दोघांचा नवाकोरा चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणा-या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले आहे.

'बिग बॉस 15' या शोची विजेती आणि हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ती सध्या काय करते’, ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता अभिनय बेर्डेसोबत तेजस्वी स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. 'मन कस्तुरी रे' हे त्यांच्या नवीन चित्रपटाचे नाव आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय. हा एक युथफुल चित्रपट आहे, असे दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.

लॉकडाऊननंतरचा अभिनयचा पहिला चित्रपट
अभिनय बेर्डेने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लॉकडाऊननंतर त्याने शूट केलेला हा पहिला चित्रपट असल्याचे सांगितले आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, ‘लॉकडाऊननंतर शूट केलेला आणि तुमच्या भेटीला येणारा माझा पहिला चित्रपट, खूप आतुर्तेने या चित्रपटाची वाट बघत होतो, आज गुडी पाडव्याच्या निमित्ताने आमचे पाहिले पोस्टर प्रदर्शित झाले. चित्रपटही लवकरच तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये पाहता येईल,’ असे अभिनय म्हणाला आहे.

तेजस्वीने हिंदीत निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातून तेजस्वी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. यापूर्वी तिने हिंदी मालिकांमधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘संस्कार -धरोहर अपनों की’, ‘स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ या गाजलेल्या मालिकांमध्ये ती झळकली. तिची ‘पहरेदार पिया की’ ही मालिका वादाच्या भोव-यातदेखील सापडली होती. 'बिग बॉस 15' या शोची ती विजेतीदेखील ठरली आहे.

याशिवाय करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत आहे.

बातम्या आणखी आहेत...