आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी:बिग बॉस मराठीच्या घरामधून गायत्री दातार बाहेर, आता टॉप 7 सदस्यांमध्ये रंगणार 'Ticket To Finale' टास्क

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरले आहेत टॉप 7 सदस्य.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली नव्या सदस्यांची एंट्री. घराचे रूपांतर लिलिपुट नगरात झाले आणि हे नवे सदस्य बनले हुकूमशहा. हा संपूर्ण आठवडा या हुकुमशहांनी चांगलच गाजवला मग तो एलिमनेशन टास्क असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क. मीनलला मिळाले बिग बॉस मराठीच्या घराचे शेवटचे कॅप्टनपद. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले. यामध्ये रविवारी मीरा जगन्नाथ सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी घोषित केले.

उत्कर्ष स्नेहामध्ये झाली शाब्दिक चकमक तर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे विशालला सांगण्यात आली. आता यामुळे इतक्या दिवसांची मैत्री पणाला तर लागणार नाही ना ? उत्कर्ष आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण करत लावणी सादर केली. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या ज्यामध्ये गायत्री दातारला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टॉप 7 सदस्य उरले आहेत.

“होणार आणखी एक मोठा धमाका...”
बिग बॉस मराठीच्या घरामधून गायत्री दातार बाहेर पडल्यानंतर आता घरामध्ये सात सदस्य उरले असून सगळ्याच सदस्यांची नजर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आहे. हे सातही सदस्य आता शेवटच्या फेरीत पोहचण्यासाठी सज्ज आहेत. या सात जणांमध्ये रंगणार आहे “Ticket To Finale” जिंकण्याचा टास्क. मीरा, जय, सोनाली, विशाल, विकास आणि उत्कर्ष यामध्ये बघुया कोणाला मिळणार तिकीट आणि कोणता सदस्य जाणार थेट फिनालेमध्ये.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, या आठवड्यात आपणा सर्वांना मिळणार आहे “Ticket To Finale” सज्ज व्हा होणार आहे आणखी एक मोठा धमाका...आता हा धमाका काय असणार ? बिग बॉस कधी जाहीर करणार ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...