आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिग बॉस मराठी 3’च्या घराची सफर:14,000 चौरस फूटात उभारले आहे ‘बिग बॉस मराठी 3’चे आलिशान घर, मराठीपण आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा करण्यात आला प्रयत्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खास छायाचित्रांच्या माध्यमातून बिग बॉस मराठीच्या घरात एक फेरफटका मारुयात...

'बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत' हे वाक्य आणि हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या घरारात घुमला. असं घर ज्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. एक असा कार्यक्रम ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलसं केलं. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती. ज्या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ज्या घराने सदस्यांची अनेक रूपं पाहिली, आव्हानांसाठी सदस्यांमध्ये रंगलेली चुरस पाहिली. सदस्यांच्या प्रत्येक कृतीचे जे घर साक्षीदार राहिलं. ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. ते घर आता परत येत आहे खर्‍या अर्थाने एंटरटेनमेंट अनलॉक करायला. कलर्स मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मराठी टेलिव्हिजनवरचा भव्य रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 3 घेऊन येत आहे.

आज आम्ही तुम्हाला याच घराची खास झलक दाखवत आहोत. बिग बॉसच्या यंदाच्या सिझनचे घर कसे असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. चला तर मग खास छायाचित्रांच्या माध्यमातून बिग बॉस मराठीच्या घरात एक फेरफटका मारुयात...

बिग बॉस मराठीचे यंदाचे घर कसे असेल?काय विशेष असेल?काय बदल करण्यात आले असतील? याविषयी जाणून घेण्यास सगळेच उत्सुक आहेत.

तर यावर्षी 14,000 चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये विविध क्षेत्रातील 15 लोकप्रिय व्यक्तिमत्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत.

घराच्या मध्यभागी मोठे आंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे.

याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील.

घरामध्ये अस्सल मराठमोळ्या आकर्षक अशा काही गोष्टींचा देखील वापर करण्यात आला आहे ज्यामुळे घराची शोभा अजूनच वाढणार आहे.

'बिग बॉस मराठी सिझन 3 आणि घराबद्दल सांगायचे झाले तर प्रत्येक गोष्टीमध्ये “मराठीपण” आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.

सेट डिझाईनपासून, टास्क, वेगवेगळया राऊंड मध्ये त्याची झलक दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साठहून अधिक कॅमेरांच्या नजरकैदेत 15 सदस्य असणार आहेत. हे 15 सदस्य स्वत:ला 100 दिवसांसाठी लॉकडाऊन करून घेणार आहेत आणि एक इंटरेस्टिंग खेळ घरात रंगणार आहे.

Weekend चा डाव याला आपण चावडीचं स्वरूप देण्यात आले आहे.

घरातील सदस्य आणि बाहेरील जग यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मागील दोन्ही पर्वांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाच्या अनोख्या पध्दतीमुळे आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे आणि मराठी माणसाला नेहेमीच आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत.

बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले, “मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती. प्रत्येकजण या वादळाला मोठ्या धीराने सामोरी गेलं आणि अजूनही जातं आहे. या सगळ्यामध्ये आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी परत येतोय महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठीचा नवा सिझनं घेऊन. बिग बॉस मराठीच्या येण्याने मी आशा करतो काही क्षणासाठी का होईना प्रेक्षकवर्ग त्यांचं दु:ख विसरेल. एका वर्षानंतर बिग बॉस मराठीचा नवा सिझन येतो आहे उत्सुकता तर नक्कीच आहे. मला खात्री आहे पहिल्या दोन्ही सिझनप्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मी सहभागी स्पर्धकांना या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो”

बातम्या आणखी आहेत...