आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी 3:बिग बॉस मराठीच्या घरामधून स्नेहा वाघ बाहेर, आता घराचे मुंबई शहारात रूपांतर

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

बिग बॉस मराठीचा गेला आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप 10 सदस्य. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले. घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष होते गायत्रीवर नाराज तर, विकास आणि सोनालीमध्ये देखील झाले भांडण.

दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणल्याने मीरा आणि विशालला भोगावी लागली कारागृहाची शिक्षा... गायत्री दातार बनली घराची कॅप्टन... हे सगळं घडत असतानाच घरामध्ये काही खास पाहुण्यांची एंट्री झाली. घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, सोनालीला सांगितली. तर दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

नॉमिनेशन कार्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले. कालच्या भागामध्ये या सदस्यांमध्ये गायत्री, सोनाली सेफ झाली आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा आणि दादूस डेंजरमध्ये गेले. मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

नवा दिवस नवा टास्क

आजपासून सुरू झाला आहे नवा आठवडा... घरामध्ये रंगणार नवे टास्क... होणार राडे, बघायला मिळणार कोण कोणाच्या बाजूने खेळणार आणि कोण कोणाच्या विरोधात. नॉमिनेशन टास्कमध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण होणार नॉमिनेट आणि कोण कोणाला करणार सेफ. तसेच आठवड्याच्या शेवटी घराला मिळणार नवा कॅप्टन. बिग बॉस मराठीच्या घराचे आता मुंबई शहारात रूपांतर होणार आहे.

बिग बॉस यांनी दिला सदस्यांना नवा आणि कठीण टास्क. त्यांनी जाहीर केले, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. त्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना जागं राहावं लागणार आहे. हे ऐकताच सदस्यांची झोप उडाली हे नक्की ! उत्कर्ष त्यावर लगेच गाणं म्हणायला लागला... मुझे निंद क्यु आये, कोई मुझको अब ये बताये... के ऐसा कैसा टास्क आगया !

बघूया टास्क नध्ये नक्की काय होणार? काय असेल हा टास्क ?

बातम्या आणखी आहेत...