आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी:बिग बॉस मराठीच्या घरामधून सुरेखा कुडची बाहेर, स्नेहा वाघ आणि जय दुधाणेला अश्रु अनावर...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवले.

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये आले होते बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय, TOP 2 स्पर्धक ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन 2 चा विजेता शिव ठाकरे आणि दुसरे स्थान पटकावलेली नेहा शितोळे. त्यांनी स्पर्धकांची कानउघडणी केली, रोज डे सेलिब्रेट केला. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली तर चुगली बूथद्वारे सोनाली पाटीलला तिच्याविरुध्द सदस्य जे बोलत होते ते तिच्या फॅनने सांगितले.

जय आणि आदिशचा रोमॅंटिक डान्स बघायला मिळाला.तर, सदस्यांनी एकमेकांबद्दल असलेल्या तक्रारी सदस्यांना सांगितल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या आठ जणांमधून कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.

शेवटी स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. तृप्ती देसाई, स्नेहा, जय आणि घरातील इतर सदस्यांना अश्रु अनावर झाले.

सुरेखा कुडची म्हणाल्या, “या घरामध्ये माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितिमुळे होतं तसं. पण, मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमनेट होईन तेव्हा मी रडणार नाही. पण या घरामध्ये काहीतरी जादू आहे”. महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवले.

बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून सुरेखा कुडची घराबाहेर पडल्या आहेत. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...