आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील या आठवड्याच्या भागात प्रेक्षकांना ट्विस्ट बघायला मिळाला. येत्या आठवड्यात एक नव्हे तर दोन सदस्य घराबाहेर पडले. शनिवारच्या भागात विकास सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख हिचाही प्रवास संपुष्टात आला आहे. यानंतर तिने एक पोस्ट केली आहे.
अमृता देशमुखची खास पोस्ट
अमृता देशमुख हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी तिने एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच मनापासून आभार, असे म्हटले आहे. "बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडलेय या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये… थोडक्यात ऑल इज नॉट वेल… काय चूक, काय बरोबर, काय फेअर, काय अनफेअर… याचे विश्लेषण तेव्हाही सुरु होते आणि आताही सुरु आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळतेय… तेव्हा तुम्ही तुमच्यातील सकारात्मक उर्जा ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा म्हणजे सगळे वाटेल.. All Is Well! धन्यवाद," असे अमृता देशमुखने म्हटले आहे.
खरं तर सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. पण नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती. आता विकास आणि अमृता घरातून बाहेर पडल्यानंतर खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच व आणखी तल्लख बुद्धीने खेळ खेळावा लागणार आहे.
कोण आहे अमृता देशमुख?
अमृता देशमुखने छोटा पडदा गाजवला आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. सध्या ती आर.जे.चे काम करत आहे. पुण्याची टॉकरवडी म्हणून ती लोकप्रिय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.