आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाची बातमी:‘बिग बॉस मराठी’ फेम शर्मिष्ठा राऊतचा झाला साखरपुडा, बघा खास फोटोज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेजस देसाई हे शर्मिष्ठाच्या भावी पतीचे नाव आहे. शर्मिष्ठाचे हे दुसरे लग्न आहे.

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शर्मिष्ठा लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असून 21 जून रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. ही माहिती स्वतः शर्मिष्ठाने सोशल मीडियावर दिली आहे. तिने साखरपुड्याचे काही खास फोटोदेखील शेअर केले आहेत. 

शर्मिष्ठाचा साखरपुडा एप्रिल महिन्यात होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलला गेला.

लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्याने इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये 35 जणांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.

लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करुन शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या साखरपुड्याचा सोहळा संपन्न झाला.

या साखरपुड्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्याचं तिने सांगितले. सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह्जची व्यवस्था कार्यक्रमस्थळी केली होती.

येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजस विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते.  

शर्मिष्ठाने एक छान पोस्ट लिहित आपली प्रेमकहाणी सांगितली आहे. ‘पराभवाच्या नाही, तर आयुष्यात प्रत्येक क्षणी अलगद मिठीत घेणारा, कायम मी आहे याची पावला पावलाला जाणीव देणारा, माझा तो, माझा स्वप्नातला राजकुमार मला भेटलाय', असे तिने यामध्ये लिहिले आहे. 

विशेष म्हणजे तेजसनेही आपल्या भावना अशाच पद्धतीने शब्दबद्ध केल्या आहेत.

शर्मिष्ठा सध्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ची भूमिका साकारात आहे. याआधी तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमध्ये काम केले. ‘आज काय स्पेशल’ या कुकरी शोचे सूत्रसंचालनही ती करत होती, ‘बिग बॉस मराठी’मुळे. तिला खरी ओळख मिळाली आणि ती घराघरांत पोहोचली. 

बातम्या आणखी आहेत...