आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील बप्पी दा:संगीतकार बप्पी लहरी आनंद शिंदेंना म्हणाले होते- 'तुम मराठी का मायकल जेक्सन है', 'बिग बॉस मराठी' फेम उत्कर्ष शिंदेंनी सांगितली खास आठवण

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आनंद शिंदे यांच्या गाजलेल्या 'नवीन पोपट' हा या गाण्याचा बप्पी दांनी हिंदी रिमेक केला होता.

बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार-गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहत्यांसह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आणि बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेने बप्पी लहरी यांच्याबद्दलची एक खास आठवण सोशल मीडियावर सांगितली असून एक थ्रोबॅक फोटोदेखील शेअर केला आहे. बप्पी लहरी यांनी आनंद शिंदे यांना "तुम मराठी का मायकल जेक्सन है" असे म्हटले होते.

काय आहे उत्कर्ष शिंदेंची पोस्ट?
उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये 'नवीन पोपट' या गाण्याबद्दलची आठवण शेअर करताना लिहिले, 'नवीन पोपटचा सुपरहिट काळ सुरु झाला होता जिकडे तिकडे त्याच गाण्याची चर्चा होती. कैक अवार्ड्स पटकावणारे नवीन पोपट हे आगळे वेगळे गीत ज्यासाठी पपांना (आनंद शिंदेंना )पहिले "प्लॅटिनम डिस्क" अवार्ड देऊन संगीतकार बप्पी लहरी दा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. "आनंद शिंदे तुम मराठी का मायकल जेक्सन है" तुम्हारा ये नवीन पोपट मुझको बोहोत पसंद आया ये गाना मे हिंदी मे बनायेंगे म्हणत पहिलं मराठी गीत हिंदीत रिमेक करण्यात आलं. जगभरात मराठी गीताचा डंका वाजला होता. कारण आनंद शिंदेंचा लोकगीतातला नवीन पोपट अफाट गाजला होता. 'नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे आपलं मराठी लोकगीत ज्याने बॉलिवूडला ही भुरळू घातली होती आणि हे गाणं हिंदीत करावा याचा अट्टहास संगीतकार बप्पी लहरी यांनी निर्मात्यांनीकडे धरला. "पाप की दुनिया "चित्रपटात संगीतकार बप्पी लहरीदा यांनी महागायक किशोर दांना घेऊन "नवीन पोपट हा" हे गाणं "मे तेरा तोता तू मेरी मैना" अशा स्वरूपात हिंदीत रिमेक केलं.'

पुढे उत्कर्षने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'आनंद शिंदे तुम्हारा व्हॉईस पहाड है डिफरेन्ट है म्हणणारे गुरुतुल्य महा गायक संगीतकार बप्पी दा आपल्याला सोडून गेले ही बातमी ऐकून वाईट तर वाटलेच. पण तो दिवस ही आठवला टी-सीरिजच्या गोल्डन चेरियेट रेकॉर्डिंग स्टुडिओत पप्पांनी मला बप्पी लहरी यांची भेट करून दिली होती. बप्पी दांनी तेव्हा पप्पांना भेटल्या भेटल्या "मायकल जेक्सन कैसा है तुम" म्हणत मिठी मारली तो क्षण आज ही जश्याचा तसा मला आठवतो. मोठी माणसे का मोठी असतात कारण त्यांचे पाय जमिनीवर असतात, याच उदाहरण म्हणजे संगीतकार बप्पी दा. #बापसंगीतकार #याद_आ रहा_है_तेरा_प्यार'

उत्कर्ष शिंदे यांनी शेअर केलेला हा खास फोटो. या फोटोत गायक मिलिंद शिंदे, संगीतकार बप्पी लहरी, गायक आनंद शिंदे, गीतकार शांताराम नांदगावकर
उत्कर्ष शिंदे यांनी शेअर केलेला हा खास फोटो. या फोटोत गायक मिलिंद शिंदे, संगीतकार बप्पी लहरी, गायक आनंद शिंदे, गीतकार शांताराम नांदगावकर

आनंद शिंदे यांच्या गाजलेल्या 'नवीन पोपट' हा या गाण्याचा बप्पी दांनी हिंदी रिमेक केला होता. 1989 मध्ये आलेल्या "पाप की दुनिया" या चित्रपटातील 'मैं तेरा तोतो, तू मेरी मैना' हे ते गाणे. हे गाणे त्याकाळी बरेच गाजले होते. शिबू मित्रा दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, नीलम, चंकी पांडे, प्राण, डॅनी डेन्झोंगपा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर बप्पी लहरी या चित्रपटाचे संगीतकार होते.

बातम्या आणखी आहेत...