आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या घरातून स्नेहलता वसईकर बाहेर:'बिग बॉसचा प्रवास इथेच संपला असला तरी…' अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून रविवारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिला निरोप देण्यात आला. स्नेहलता आणि विकास डेंजर झोनमध्ये आले आणि या आठवड्यात स्नेहलताला घर सोडून जावे लागले, महेश सरांनी हे सांगताच अपूर्वा, अक्षय आणि स्नेहलताला अश्रू अनावर झाले. स्नेहलताने पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री घेतली होती. घराबाहेर पडल्यानंतर तिने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आहेत.

स्नेहलताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर तिने धन्यवाद असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. तुमच्या सगळ्यांचा प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद, असे तिने याला कॅप्शन देताना म्हटले आहे.

"बिग बॉसचं घर असो किंवा माझा कुठलाही नवा प्रवास तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून जे प्रेम सातत्याने करत आहात त्यासाठी मनापासून आभार ! बिग बॉसचा प्रवास इथेच संपला असला तरी नव्या वर्षात नवीन भूमिकेत भेटूच… तुमचं हे प्रेम, खंबीर पाठिंबा कायम राहू दे ! तुमचीच स्नेहलता…", असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता नवीन वर्षात स्नेहलता कोणत्या भूमिकेतून भेटीला येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्नेहलता ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऐतिहासिक भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये तिने ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली.

बातम्या आणखी आहेत...