आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे:ही आहे रंगभूमीवरची 'फुलराणी', आईकडूनच मिळाला आहे अभिनयाचा वारसा; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत आहे जवळचे नाते 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आज अमृताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयी आणखी बरंच काही...

गोड चेहरा, बोलका स्वभाव असलेली तरूण पिढीतील एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची ही लेक. 13 मे 1979 रोजी जन्मलेल्या अमृताने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. अष्टपैलू अभिनेत्री असलेली अमृता एक लेखिका, गायिका, संगीतकारदेखील आहे.

 • सोनाली कुलकर्णीची वहिनी आहे अमृता...

अमृताचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णीसोबत झाले आहे. या नात्याने सोनाली अमृताची नणंद होते. संदेश आणि अमृताचे लव्ह मॅरेज आहे. अमृताचा नवरा संदेश स्वत: एक लेखक आणि इंजिनिअरही आहे. तो पूर्वी एका इंजिनीअिरग महाविद्यालयात ‘इंजिनीअिरग ड्रॉइंग’ हा विषय शिकवायचा. त्याच्या प्रेमात पडल्यावर अमृता एकदा चोरून त्याच्या एका लेक्चरला बसली होती.

 • आईकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
 • दिल्लीत एनएसडीत अमृता सत्यदेव दुबेंकडून ती अभिनयातील बारकावे शिकली. तिथे रंगभूमीवर हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले.
 • महाराष्ट्रात परतल्यानंतर तिला रंगभूमीवर 'ती फुलराणी' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ही भूमिका त्यापूर्वी भक्ती बर्वे यांनी साकरली होती. या नाटकातील अमृताच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
 • 2004 मध्ये 'श्वास' या सिनेमाद्वारे अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. श्वासला 51 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. शिवाय ऑस्करमध्येही या सिनेमाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
 • ‘अवघाची संसार’ या मालिकेतील भूमिकेने अमृताही आज घराघरांत ओळखली जाते. या नाटकात अमृताने अभिनेता प्रसाद ओकसोबत काम केले होते.
 • अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर ब-याच कालावधीने तिचं आलेलं एक नाटक म्हणजे ‘पुनश्च हनीमून’;. हे नाटक अतिशय लोकप्रिय झालं. या नाटकाची महत्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन तिचा पती संदेश कुलकर्णीने केलं असून यात त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिकासुद्धा केली होती.
 • अमृताची खासियत म्हणजे स्वत:लाच चॅलेंज ती नेहमी करते आणि ते ती यशस्वीपणे पूर्ण करते, मग ते कधी गाणं असो किंवा लिखाण.
 • अमृता उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तीन वर्षे तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. 'जाता जाता पावसाने' हा तिचा अल्बम प्रकाशित झाला आहे. याशिवाय हापूस (2010), अजिंठा (2012) या सिनेमांसाठी अमृताने पार्श्वगायन केले आहे.
 • अमृता एक संगीतकारसुद्धा आहे. निताल (2006) आणि तीन बहनेसाठी तिने संगीत दिले आहे. शिवाय सारेगमप या मराठी सांगितिक कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमात टॉप 5 पर्यंत तिने मजल मारली होती.
 • अमृताने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केले आहे. रमन राघव 2.0 या सिनेमात अमृता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या कान फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले होते. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यानंतर कानवारी करणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री ठरली.
 • अमृता सुभाष एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी ‘एक उलट.. एक सुलट’; नावाचे सदर लिहायची. या स्तंभलेखनावर आधारलेल्या तिच्या ‘एक उलट.. एक सुलट’; या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले होते.
 • अमृताला ‘किल्ला’; या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
 • अमृताने तिची आई ज्योती सुभाष यांच्यासोबत आजी, झोका, गंध, मसाला, नितळ, वळू, विहिर या सिनेमांमध्ये काम केले आहे. आजी या सिनेमात ज्योती सुभाष यांनी अमृताच्या आजीची भूमिका वठवली होती. तर 2009 मध्ये आलेल्या गंध या सिनेमात या दोघी आई-मुलीच्या भूमिकेत झळकल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...