आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे स्पेशल:खासगी आयुष्यात इमोशनल आहे सई, बालपणीच हरपले वडिलांचे छत्र; पत्रातून घातली होती वडिलांना भावनिक साद

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. रुपेरी पडद्यावर ती आपल्या बोल्ड आणि बिनधास्त इमेजसाठी ओळखली जाते. पण पडद्यावर बोल्ड आणि बिनधास्त दिसणारी सई खऱ्या आयुष्यात मात्र तितकीच इमोशनल देखील आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'फॅमिली कट्टा' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सईची तिच्या चाहत्यांना माहित नसलेली बाजू समोर आली होती.

चित्रपटात वडील आणि मुलीचे नाते रंगवत असताना सईची खऱ्या आयुष्यातील तिच्या बाबांसाठी असलेली भावनिक ओढ दिसून आली होती. सईचे वडील हयात नाहीत. सई लहान असतानाच त्यांचे निधन झाले होते.    स्वतःच्या बाबांशी हे इमोशन्स शेअर करण्यासाठी सईने तिच्या बाबांना एक पत्र लिहिले होते. वडील हयात असताना त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्याची खंत या पत्रातून स्पष्ट दिसून आली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच्या मुलाखतीतसुद्धा वडिलांच्या मृत्यूशी सबंधित असलेली आठवण सांगताना सईला रडू अनावर झाले होते. एका दिवाळीत सईचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून निघून गेले. नंतर दोन ते तीन वर्षांत त्यांची पोस्टमार्टम झालेली बॉडी तिला बघावी लागली होती. या दोन तीन वर्षांत तिचा तिच्या वडिलांशी काहीच संपर्क नव्हता.

फॅमिली कट्टा या चित्रपटाच्या वेळी सईने आपल्या वडिलांसाठी लिहिलेले भावनिक पत्र
फॅमिली कट्टा या चित्रपटाच्या वेळी सईने आपल्या वडिलांसाठी लिहिलेले भावनिक पत्र

'फॅमिली कट्टा' या चित्रपटाच्या निमित्ताने सईच्या आयुष्यात दडलेले हे दुःख पहिल्यांदाच तिच्या चाहत्यांसमोर उघड झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...