आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठीतील अनोखा चित्रपट:'दृष्टांत'मध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी केले काम, गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार हे देखील दृष्टिहीन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाच्या निर्मात्यांनी गायन, संगीतकार आणि डबिंग कलाकार यासाठी दृष्टिहीन कलाकारांना संधी दिली आहे.

आशयघन विषयांसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सातत्याने आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. मराठी चित्रपटांची ही 'अर्थ'पूर्ण भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. तसाच एक चित्रपट आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘दृष्टांत’ आहे.

‘दृष्टांत’ सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात सुरु आहे. चित्रपटातील कलाकार हे ख-या आयुष्यात दृष्टिहीन असून त्यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत हे भारतीय सिनेमाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या चित्रपटाचे भाग आहेत.

अभिजित के. झांजल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झाले असून, मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याभोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

जीवनातील महत्व आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांना बघता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेतली आहे.

चित्रपट बनवण्यामागचा मुख्य उद्देश सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसेच अवयव दान आणि सामाजिक दृष्ट्या कमी भाग्यवान व्यक्तीला मदत करणे हा आहे. बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

बातम्या आणखी आहेत...