आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटात दिसणार सनी लिओनी:'शांताबाई' या गाण्यावर थिरकणार सनी लिओनी, 'आमदार निवास'मध्ये झळकणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आमदार निवास'मध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता सनी मराठीमध्ये आणखी एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने 'बॉईज' या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. लवकरच सनी लिओनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आमदार निवास'मध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

आगामी 'आमदार निवास' या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाईच्या रूपात भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलिवूडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

2015 मध्ये शांताबाई या गाण्याने धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला 85 करोडहून जास्त व्ह्यूज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लियोनी दिसणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे.

'आमदार निवास' हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...