आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हात मदतीचा:मराठी कलाकारांच्या मदतीसाठी पुढे आले अमिताभ बच्चन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला अशी केली मदत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामंडळाच्या 500 सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. असाच मदतीचा हात पुढे करत ज्येष्ठ अभिनेते  अमिताभ बच्चन यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला सहकार्य केले आहे.

‘बिग बाजार’चे 1500 रुपयांचे 500 कूपन्स अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. नुकतेच महामंडळाच्या 500 सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. या कूपन्स अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

या मदतीबद्दल 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.

  • अमिताभ यांचे मदतकार्य गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात अमिताभ बच्चन गेल्या तीन महिन्यांपासून मदतकार्यात व्यस्त आहेत. त्यांची कंपनी एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव त्यांच्या माध्यमातून ते गरजूंना मदत करत आहेत. परप्रांतीय 500 कामगारांना त्यांनी विमानाने वाराणसीला त्यांच्या स्वगृही पाठवले.

याशिवाय ते हाजी अली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहब ट्रस्ट यांच्या सहकार्याने हाजी अली दर्गा, अँटॉप हिल, बाबुलनाथ मंदिर, माहीम दर्गा, धारावी, सायन 90 फीट रोड, अरब गली, कोसला बंदर आणि वरळी लोटससह मुंबईतील विविध ठिकाणी दररोज 4500 हून अधिक फूड पॅकेट्स वितरित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...