आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या वातावरण थोडं थंडावल्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यात सर्वजण दंग आहेत. छोट्या पडद्यावरील 'डॉक्टर डॉन' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. कडाक्याची थंडी असल्यामुळे रात्री शूटिंग करताना कलाकार थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. उब मिळवण्यासाठी हे सर्व कलाकार मिळून सेटवर शेकोटी करून माहोल बनवत आहेत. त्या शेकोटीमधून उब घेऊन धमाल गप्पा रंगताना दिसत आहेत.
'डॉक्टर डॉन'च्या सेटवर कलाकार ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन सुद्धा अशीच धमाल मस्ती करताना पाहायला मिळतात. कधी गिटार वाजवून गाण्यांची मैफिल तर कधी सेटवर पक्वान्नांची मेजवानी रंगलेली असते. पण सध्या या थंडीच्या ऋतूमध्ये सर्व कलाकार या थंडीचा आनंद घेण्यात मग्न आहेत.
सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आणि अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.