आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ मधील लोकप्रिय विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याने त्याच्या कुटुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया’ हे गाणे व्हायरल झालं. या गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कुशलने, पत्नी आणि मुलांबरोबर सादर केलं. आता कुशलने लॉकडाऊनमध्ये हेअर कट केलाय आणि त्याच्या चाहत्यांसाठी त्याचा फोटो देखील शेअर केला आहे.
कुशलने चक्क टक्कल केलं असून सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोला हे कॅप्शन दिलय, "माझ्या घरचे नेहमी म्हणायचे, मी म्हणजे गेलेली केस आहे !! (एकदाच माझ डोकं सटकलं आता डोक्यावरून काहीही सटकतं.) लॉकडाऊन हेअरकट." लॉकडाऊनमध्ये बरेच जण ही सेम स्टाईल करत आहेत आणि कुशलने देखील हा ट्रेंड फॉलो केला. त्याचा हा गॉन केस लुक चाहत्यांना मात्र प्रचंड आवडलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.