आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींना उजाळा:त्या दिवशी खरंच माणसातल्या ‘देवाला’ भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला; रमेश देव यांच्यासाठी निलेश साबळेची भावूक पोस्ट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निलेश साबळने पोस्ट शेअर करत रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (93) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. रुपेरी पडद्याप्रमाणे रमेश देव यांनी एकेकाळी मराठी रंगभूमीही गाजवली होती. देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार निलेश साबळने पोस्ट शेअर करत रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

निलेश साबळेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रमेश देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत काही दिवसांमध्ये चला हवा येऊ द्यामध्ये ते येणार होते असे म्हटले आहे. “मोठा माणूस ! या वयातही आम्हाला लाजवेल हा उत्साह आणि शेवटपर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा. हे आम्ही आत्ताच 27जानेवारीला अनुभवलं. सरांनी ‘हे तर काहीच नाय’ मध्ये येवून आम्हाला आर्शिवाद दिला . सगळंच स्वप्नवत. त्यांच्या आयुष्यातले मंतरलेले किस्से त्यांनी सांगून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तोंडभरून कौतुक केलं. त्या दिवशी खरंच माणसातल्या ‘देवाला’ भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला” असे निलेश साबळेने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे निलेश साबळे म्हणाला, “पुढच्याच आठवड्यात ‘चला हवा येवू द्या’मध्ये संपूर्ण कुटुंबासह ते येणार होते.आता बातमी ऐकून खरंच काही सुचत नाही अशी आमची सर्वांचीच अवस्था झाली आहे . पण 27 तारखेचा तो संपूर्ण दिवस तुमच्या जवळ आम्हाला वावरता आलं, कलाकारातला माणूस कसा असावा आणि किती मोठा असावा याचा अनुभव आम्हाला आला .देव साहेब आपण खरंच ग्रेट आहात, आणि नेहमी रहाल,” अशा शब्दांत निलेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...