आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. वेळप्रसंगी कान धरला आणि पाठ थोपटून भरपूर कौतुकही केलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या संकट काळात प्रत्येकाला आपापल्या काळज्या आणि ताणतणाव आहेत, पण काही क्षणासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. 'सध्या लॉकडाऊनमध्येही चला हवा येऊ द्या मुळे आमचा वेळ मजेत जातो' असं सांगणारे अनेक फोन आणि मेसेजेस या कार्यक्रमातील कलाकारांना येतात.
प्रेक्षकांच्या या आवडत्या कार्यक्रमाचं शूटिंग देखील लवकरच चालू होईल पण या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात आता प्रेक्षकांना सहभागी होता येणार नाहीये.
याबद्दल बोलताना कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, "येत्या काळात 'न्यू नॉर्मल'मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळ्या प्रकारची स्किट्स आम्ही सादर करू. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवाणी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची मी खात्री देते", असे श्रेयाने सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.