आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा:किचन कल्लाकारच्या सेटवर बच्चेकंपनीची धूम, या लहानग्यांचे लहान हात किचनमध्ये करणार मोठी कमाल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता या बच्चेकंपनीला महाराज कोणता पदार्थ करायला सांगणार हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरेल.

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात त्यांचे लाडके बालकलाकार महाराजांना त्याच्या इवल्याश्या हाताने पदार्थ करून देणार आहेत.

आगामी भागात प्रेक्षकांची लाडकी परी म्हणजे मायरा वैकुळ, सारेगमपची फायनलिस्ट स्वरा जोशी आणि खारी बिस्कीट मधली खारी म्हणजे वेदश्री खाडिलकर सहभागी होणार आहेत. महाराज नेहमी कलाकारांना काहीतरी कठीण पदार्थ करायला लावतात आता या बच्चेकंपनीला महाराज कोणता पदार्थ करायला सांगणार हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरेल.

आता या लहानग्यांचे लहान हात किचनमध्ये काय मोठी कमाल करून दाखवणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...