आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'येऊ कशी तशी मी नांदायला':चिन्या म्हणजेच अभिनेता अर्णव राजे सांगतो - अभिनयाचं बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालं आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता अर्णव राजेसोबत साधलेला हा खास संवाद

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील ओम आणि स्वीटू या व्यक्तिरेखांसोबतच इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. त्यातील एक जवळची वाटणारी व्यक्तिरेखा म्हणजे चिन्या. असा एक भाऊ हवा असं चिन्यांकडे बघून सगळ्यांना वाटतं. अभिनेता अर्णव राजे ही भूमिका अत्यंत चोख बजावतोय. त्याच्या सोबत साधलेला हा खास संवाद

  • तुला अभिनयाची गोडी केव्हा पासून लागली?

मला अभिनयाची गोडी लहानपणापासूनच लागली होती. माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं आहे. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे.

  • येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत संधी कशी मिळाली?

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुवर्ण राणे यांनी माझं एकांकिकेतील काम पाहिलं होतं. त्यामुळे मला या मालिकेत संधी मिळाली.

  • तुझ्यात आणि चिन्यामध्ये किती साम्य आहे?

मला सर्वजण म्हणतात की, मी चिन्यासारखाच आहे. पण खऱ्या आयुष्यात मी चिन्यांच्या अगदी उलट स्वभावाचा आहे. त्यामुळे हे पात्र साकारताना मला बरीच मेहनत घ्यावी लागली

  • मालिकेला आणि तुझ्या व्यक्तिरेखेला मिळणार प्रतिसाद पाहून तुला काय भावना व्यक्त कराव्याशा वाटतात?

अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे ओळख मिळाली. चिन्यामुळे मी घराघरात पोहोचलो. माझ्या कुटुंबियांच्या प्रोत्साहनामुळे मला ऊर्जा मिळते. त्यांच्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकलो. याच संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला आणि गुरूंना मी देतो.

बातम्या आणखी आहेत...