आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:सिने स्थिरछायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे निधन, 'मैने प्यार किया',  'नरसिंहा'सह 150हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांसाठी केले स्टील फोटोग्राफीचे काम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ते ७३ वर्षांचे होते.

प्रख्यात सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले, ते ७३ वर्षांचे होते. अविवाहित होते. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते. दामोदर कामत स्थापन केलेल्या 'कामत फोटो फ्लॅश' या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून ते काम करीत होते.

त्यांच्या अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण त्यांनी केले होते. तसेच राज कपूर यांच्या आरके बॅनरनिर्मित 'मेरा नाम जोकर', 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेम रोग', 'धरम करम', 'हिना' तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'अखियोंके झरोखेसें', 'नादिया के पार', 'सारांश', 'उपहार', 'गीत गाता चल', 'चितचोर', 'मैने प्यार किया', एन. चंद्रा यांच्या 'नरसिंहा'सह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम केले आहे.

मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शित 'सखी माझी', कुमार सोहनी दिग्दर्शित 'जोडीदार', 'तुझ्याचसाठी' अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी स्थिरचित्रण केले आहे. राज कपूर साहेब, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अश्या अनेक दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले होते. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कन्टीन्यूटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते.

बातम्या आणखी आहेत...