आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी:कॉमन मॅन त्रिशूल मराठेला पडावे लागले घराबाहेर, मांजरेकरांनी स्नेहलात वसईकरला सुनावले खडे बोल

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव यांच्यानंतर आता कोणता सदस्य घराबाहेर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या आठवड्यात त्रिशूल मराठेला घराबाहेर पडावे लागले आहे. 'एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावे लागत आहे,' असे म्हणत मांजरेकरांनी त्रिशूलचा निरोप घेतला. या पर्वात त्रिशूलच्या रूपाने पहिल्यांदाच सामान्य नागरिक सहभागी झाला होता. त्यानिमित्ताने एका सामान्य चाहत्याला पहिल्यांदाच बिग बॉसचा खेळ खेळण्याची संधी मिळाली होती.

त्रिशूलने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांबरोबर महेश मांजरेकर यांचेही मन जिंकले होते. ‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनच्या रंगलेल्या पहिल्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी त्रिशूलचे भरभरून कौतुकाही केले. पण नंतरच्या काही दिवसात त्रिशूल मागे पडलेला दिसला. खेळातील त्याचा सहभागही कमी झाला. त्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागले. त्रिशूलच्या घराबाहेर जाण्याच्या बातमीने सर्वच स्पर्धकांना वाईट वाटले.

काय घडले बिग बॉसच्या चावडीवर?
रविवारी ‘बिग बॉस मराठी 4’ची चावडी रंगली होती. यावेळी महेश मांजरेकरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली? कोण कुठे चुकले? कोण बरोबर खेळले या सगळ्याचा हिशोब घेतला. किरण माने आणि विकास सावंत यांचे महेश मांजरेकरांनी त्यांच्या खेळाबद्दल कौतुक केले. तर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आलेल्या स्नेहलात वसईकर हिला खडे बोल सुनावले.

बातम्या आणखी आहेत...