आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटाचा ट्रेलर:सुमित्रा भावेंनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ‘दिठी’चा ट्रेलर पाहा, 'या' दिवशी होतोय प्रदर्शित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात अनेक नावाजलेल्या कलाकारांची वर्णी लागली आहे.

चाकोरीबाहेरील चित्रपटांद्वारे चित्रपटसृष्टीवर आपला अनोखा ठसा उमटविणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिठी' या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येते. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. हा चित्रपट येत्या 21 मे रोजी सोनीलिव ओरिजिनल्सवर प्रदर्शित होतोय.

या चित्रपटात अनेक नावाजलेल्या कलाकारांची वर्णी लागली आहे. अभिनेता किशोर कदम, डॉ.मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, कैलाश वाघमारे, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात साकारल्या आहेत. प्रसिद्ध मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि. बा. मोकाशी यांच्या ‘ आता आमोद सुनासी आले’ या कथेवर आधारित हा चित्रपट आहे.

19 एप्रिल रोजी झाले सुमित्रा भावे यांचे निधन
सुमित्रा भावे यांचे यावर्षी 19 एप्रिल रोजी निधन झाले होते. त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला 2016 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या सोबतीने अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. सुमित्रा भावे यांना 6 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 हून अधिक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तसेच, त्यांच्या असंख्य कथा, पटकथा, गीते, त्यांचे कला दिग्दर्शन, वेशभुषा आणि दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...