आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये लग्न:दगडीचाळीत पार पडला 'डॅडी'च्या मुलीचा लग्नसोहळा, या अभिनेत्यासोबत अडकली लग्नाच्या बेडीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाला योगिता आणि अक्षय यांचे कुटुंबातीलच 15 ते 20 जण उपस्थिती होते.
  • लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारेसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. 8 मे रोजी दोघांचे लग्न पार पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे लग्न लॉकडाऊनचे सर्व नियम पाळूनच झाले. लग्नाच्या वेळी सर्व जण मास्क लावून दिसले. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच हे लग्न पार पडले. आता या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. 

लग्नाला योगिता आणि अक्षय यांचे कुटुंबातीलच 15 ते 20 जण उपस्थिती होते. गुरुवारी संध्याकाळी दोघांना हळद लागली. तर रीतीप्रमाणे नवरदेव अक्षय वाघमारेने हातावर मेहंदी लावली होती. अक्षयने मेहंदी आणि हळदीचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. 

View this post on Instagram

हळद 💛 . #quarantinwedding #weddingvibes #

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on May 7, 2020 at 10:46am PDT

29 मार्च होती लग्नाची तारिख 

विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नासाठी 29 मार्च ही तारिख निश्चित झाली होती. पण लॉकडाऊनमुळे ठरलेल्या तारखेला हे लग्न होऊ शकले नव्हते. त्यानंतर मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन 8 मार्च रोजी हे लग्न पार पडले. याविषयी सविस्तर सांगताना एका मुलाखतीत अक्षय वाघमारे म्हणाला होता, “आम्ही लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. 5 मे रोजी रात्री पोलिसांकडून परवानगीचा मेल आला. त्यानंतर लगेचच आम्ही 8 मे ही लग्नाची तारीख ठरवली. आम्ही लग्नाची शॉपिंग आधीच करून ठेवली होती. 29 मार्चला लग्न होईल या हिशोबाने आम्ही सगळी तयारी केली होती. त्यामुळे आता फार कष्ट करावे लागणार नाही.” सर्व काही सुरळित झाल्यानंतर धुमधडाक्यात रिसेप्शनचे आयोजन केले जाईल, असेही अक्षयने सांगितले. 

पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात अक्षय आणि योगिता 

योगिता आणि अक्षय एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखतात. गेल्याचवर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. अक्षय मुळचा पुण्याचा असून तो मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. तर योगिता सामाजिक संस्थांसाठी काम करते. शिवाय काही चित्रपटांची निर्मितीही तिने केली आहे.  

बातम्या आणखी आहेत...