आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामाची पोचपावती:'दख्खनचा राजा ज्योतिबा'च्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता, ज्योतिबासारखीच वेशभुषा करत लावली सेटवर हजेरी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते.

छोट्या पडद्यावरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांना देखील ही मालिका आवडत आहे. याचीच पोचपावती देणारा एक प्रसंग नुकताच घडला. ज्योतिबावर भरभरुन प्रेम करणारा एक चिमुकला चाहता नुकताच सेटवर पोहोचला. विशेष बाब म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्याने या सेटवर हजेरी लावली होती. या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते.

या छोट्या चाहत्याला भेटून ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचा आनंदही गगनात मावत नव्हता, ‘अशा चाहत्यांमुळेच काम करायला नवी ऊर्जा मिळते. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका लहान मुलांनाही आवडते आहे याचा आनंद आहे. सेटवर पोहोचलेल्या या चिमुकल्याला तर मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत पाठ होतं आणि ते त्यांना आम्हा सर्वांसमोर सादर केलं. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच राहो,' अशी भावना विशालने व्यक्त केली.

दख्खनचा राजा ज्योतिबा नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी 6 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

बातम्या आणखी आहेत...