आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मालिका:ही आहे 'दार उघड बये' मालिकेची कहाणी, मुख्य भूमिकेत सानिया चौधरी आणि रोशन विचारे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर लवकरच दार उघड बये ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाला. रोशन विचारे या मालिकेचा मुख्य नायक असून सानिया चौधरी मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेची काय आहे कथा जाणून घेऊया...

ही आहे कथा

संबळ वाजवून उदरनिर्वाह करत पारंपारिकता जपणाऱ्या कुटुंबात आई वडील दोन मुली एक मुलगा आहे. वडील निष्णात संबळवादक असून शहरातील एका श्रीमंत घरात प्रत्येक नवरात्रात संबळ वाजवण्याचा मान त्यांच्याकडे आहे. कर्जापायी सावकार घर हिसकावू पाहत असताना वडील काही दिवसांची सवलत घेऊन त्या गर्भश्रीमंत घरी नवरात्रीच्या नऊ दिवस वाजवण्यासाठी जातात.

त्यांना दम्याचा आजार असल्याने काळजीपोटी मोठी मुलगी मंजिरी सोबत जाते. त्या घरातील मुख्य व्यक्ती रावसाहेब नगरकर पुरुषप्रधान मानसिकतेचा असून घरातील बायांवर नाच गाणे वाजवणे या सर्वांवर बंधणे आहेत. त्याची सावत्र आई चंद्रा तमासगीर होती व तिच्यामुळेच माझी सख्खी आई गेली म्हणून तिला एका घरात बंदिस्त केलेले असते. घट बसतानाच्या पहिल्या आणि महत्वाच्या आरतीला वाजवताना वडिलांना दम्याचा प्रचंड त्रास झाल्याने आरती मध्येच थांबवावी लागते. अनेक वर्षांची परंपरा मोडल्याने चिडून रावसाहेब त्यांना घराबाहेर काढत असताना मंजिरी स्वतः संबळ घेऊन वाजवायला उभी राहते. पुरुषी अहंकार असलेल्या कुटुंबप्रमुखाला स्त्रीने देवीपुढे संबळ वाजवणे प्रचंड त्रास देवून जाते.

ही मालिका 19 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...