आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग डायरी:'डॉक्टर डॉन'मध्ये ऐन पावसाळ्यात साजरा होणार अनोखा व्हॅलेंटाईन्स डे, देवा आणि डॉ. मोनिका यांची लव्ह स्टोरी सुरु

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'डॉक्टर डॉन' या मालिकेमध्ये लव्हस्टोरी सुरु झाली आहे.

छोट्या पडद्यावरील 'डॉक्टर डॉन' ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजतेय. नेहमीच्या सासू सुनांच्या नातेसंबंधांपेक्षा वेगळी अशी या मालिकेची कथा असल्याने अल्पावधीतच मालिका घराघरापर्यंत पोहोचली आणि आता तर या मालिकेमध्ये लव्हस्टोरी सुरु झालीये आणि तीही मालिकेमधल्या महत्वाच्या व्यक्तिरेखा देवा आणि डॉ मोनिका यांच्यामध्ये.

देवाच्या लाडक्या डॉलीबाईंना प्रपोज करण्यासाठी देवाने जय्यत तयारी केलीये. डॉलीबाई किती स्पेशल आहेत हे त्यांना जाणवून देण्यासाठी देवाने आत्तापर्यंत अनेक आगळ्या वेगळ्या गोष्टी केल्यात. आणि आता पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची कबूली देण्यासाठी देवा एकदम अनोख्या पद्धतीने सज्ज झालाय.

विशेष म्हणजे यासाठी मालिकेच्या क्रिएटीव्ह टिमने व्हॅलेंटाईन्स डे किंवा कुठल्याही खास दिनाची वाट न पहाता चक्क सप्टेंबर महिन्यातच प्रेमाचं रोमहर्षक वातावरण तयार करायचं ठरवलंय.

पहिल्यांदाच एका मराठी वाहिनीवर अशा प्रकारचा पावसाळ्यातला हा व्हॅलेंटाईन्स डे साजरा होतोय. शिवाय डॉक्टर डॉन या मालिकेमधून हा पावसाळी व्हॅलेटाईन्स डे साजरा होत असल्याने ही मालिकाही ट्रेंडसेटर बनलीये.

सध्या या पावसाळी व्हॅलेंटाईन्स डेचा खास प्रोमो झी युवा वाहिनीवर पहायला मिळतोय. पण या अनोख्या व्हॅलेंटाईन्स डेचा संपुर्ण अनुभव प्रेक्षकांना डॉक्टर डॉन या मालिकेच्या माध्यमातून घेता येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser