आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकिंग व्हिडिओ:देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात स्वरबद्ध झाले 'अजूनही बरसात आहे'  या मालिकेचं शीर्षकगीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनी शीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

सोनी मराठी वाहिनीवर 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनी शीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

या मालिकेतून उमेश आणि मुक्ता ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. तर उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानेही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल 8 वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...