आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अपडेट:मराठी मालिकांमधला मॅचो मॅन देवदत्त नागे थिरकला गोविंदाच्या तालावर, डॉ. मोनिकाला इम्प्रेस करण्यासाठी गाणार 'अ आ ई'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खंडोबासारखी अत्यंत संवेदनशील आणि सखोल अशी भुमिका साकारल्यानंतर देवदत्तचा हा नवा डॉन देवा अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.

'जय मल्हार' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची वेगळी जागा तयार करणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या डॉक्टर डॉन या मालिकेमधून आपली अभिनयाची नवी छाप उमटवतोय. झी युवावरच्या या मालिकेमध्ये देवदत्त देवा सुर्वे नावाच्या एका इंटरनॅशनल डॉनची व्यक्तिरेखा साकारतोय. यात देवदत्त सोबत अभिनेत्री श्वेता शिंदे डिनच्या भूमिकेत पहायला मिळतेय. सध्या या मालिकेमध्ये देवदत्त आणि श्वेता यांच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु झालाय, ज्यात देवा डॉ. मोनिकाच्या प्रेमात पडलाय, मात्र ती अजूनही त्याच्याशी डिनच्या आविर्भावातच वागतेय. आता प्रेमाचे हे रंग मालिकेमध्ये रंगताना त्यात रुसणं फुगणं आहेच पण त्यासोबत नाच गाणे हेही दिसणार आहे.

अशाच एका रोमँटिक सीनचे शुट नुकतेच डॉक्टर डॉनच्या सेटवर पार पडले. यात मराठीमधला हा मॅचो मॅन चक्क गोविंदाच्या गाण्यावर थिरकलाय. 'राजा बाबू' या हिंदी सिनेमातल्या 'अ आ ई या' गोविंदाच्या हिट गाण्यावर देवदत्तला थिरकताना पहाणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरलीये. देवदत्त साकारत असलेल्या देवा हा डॉन चक्क डॉ. मोनिका म्हणजेच श्वेताच्या प्रेमात पडलाय आणि आपल्या या प्रेमाची कबूली देण्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. याचाच एक भाग म्हणजे देवाचा हा धमाकेदार डान्स.

या अनुभवाबद्दल देवदत्त सांगतो, “जेव्हा मालिकेचे प्रमोशन सुरु होते तेव्हा मी आणि श्वेता डॉनच्या गाण्यावर नाचलो होतो, पण माझे जे पंटर तुम्ही या मालिकेमध्ये पाहतात त्यांच्यासोबत डान्स करण्याचा माझा पहिलाच अनुभव. शिवाय आम्ही चौघेही ट्रेन्ड डान्सर्स नाही त्यामुळे डान्स शिकताना आमची एकमेकांमध्ये तारांबळ उडत होती, यातच श्रावण सुरु आहे त्यामुळे उनपावसाचा सुंदर खेळ आमच्या शुटिंगदरम्यान सुरु होता. आमच्या क्रिएटीव्ह टिमने खुप चांगले चांगले प्रॉप्स आम्हाला दिले. विशेषतः छत्रीचा वापर खुप वेगळ्या पद्धतीने यात केलाय. ते प्रेक्षकांना टीव्हीवर पहाताना जाणवेलच.”

देवदत्त पुढे सांगतो की, आमची तारांबळ उडत असली तरी आम्हाला आणि विशेषतः मला यात श्वेताची खुप सुंदर साथ मिळाली ती स्वतः खुप सुंदर डान्सर आहे, त्यामुळे मला तिने खुप चांगल्यापद्धतीने सांभाळून घेतलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं गाणं त्यात ते गाणं गोविंदाचं कधीच विचार नव्हता केला की बॉलिवूडच्या या डान्सर नंबर वनच्या गाण्यावर माझ्यासारखा सुमार डान्सर थिरकेल ही एक स्वप्नपुर्ती असल्याची कबूली देवदत्तने दिली.

बातम्या आणखी आहेत...