आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची होणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. 'देवमाणूस' या मालिकेत डॉक्टरला बघून अनेकांची भंबेरी उडते. पण आता प्रेक्षकांना डॉक्टरचा किचनमध्ये उडालेला गोंधळ पाहायला मिळणार आहे.
'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात 'देवमाणूस 2' मालिकेतील काही कलाकार या किचनमध्ये सज्ज होणार आहेत. आपलं सावज हेरुन त्यांना लुबाडणे डॉक्टरसाठी सहज सोपं आहे, पण किचनमध्ये महाराजांचा आवडता पदार्थ बनवण्याचं दिव्य डॉक्टर कसं पेलवणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
किचन कल्लाकारमध्ये देवमाणूस 2 मधील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड, प्रेक्षकांची आवडती सरू आजी आणि डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख सहभागी होणार आहेत. महाराज या कलाकारांना चमचमीत पदार्थ बनवण्याचं आव्हान देणार आहेत, तसेच शेठकडून सामान मिळवण्यासाठी देखील अनेक मजेदार चॅलेंजेस या सगळ्यांना देण्यात आले. देवमाणूस हा किताब मिळवलेले डॉक्टर आता किचन कल्लाकारचा किताब मिळवणार का? हे बघणं औस्त्युक्याच ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.