आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिकेसाठी मेहनत:ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने सेटवरच बनवले जीम, सेटवरील वस्तूंच्या सहाय्याने करतो वर्कआऊट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डाएटिशनच्या सल्याने विशाल त्याचा आहार घेतो.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल त्याच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून तो वर्कआऊट करतो. खरं तर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नसल्यामुळे विशालने सेटवरच वर्कआऊट करणं सुरु केलं आहे.

भूमिकेसाठी फिटनेस राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच विशालने हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्याने सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शाकाहारी आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अशा सकस आहाराकडे त्याचा कल असतो. सोबतीला दररोजचा व्यायाम असल्यामुळे विशालला फिटनेस राखणं शक्य झालं आहे.

फिटनेस प्रेमाविषयी सांगताना विशाल म्हणाला, ‘मी ज्योतिबाच्या भूमिकेसाठी बारा किलो वजन वाढवलं होतं. मात्र शूटिंगच्या वेळापत्रकातून हे वजन तसंच राखणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. दररोज जीमला जाणं शक्य नसल्यामुळे मी सेटवरच वर्कआऊट करतो. सेटवर लाईट्ससाठी वापरले जाणारे वेट्स आणि काही उपलब्ध गोष्टींचा वापर करुन मी वर्कआऊट करतो. डाएटिशनच्या सल्यानेच मी माझा आहार घेतो. सेटवर माझ्या खाण्यापिण्याचीही योग्य काळजी राखली जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच मला माझा फिटनेस राखणं शक्य होत आहे.’

बातम्या आणखी आहेत...