आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावूक क्षण:'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या धर्मेश सरांना मिळाले सरप्राईज, शोमध्ये वडिलांना बघून झाले इमोशनल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शोमध्ये धर्मेश सरांचा पहिला इंटरव्ह्यू आणि त्यांचा एकंदरीत प्रवास दाखवला आहे.

डान्सचा टॉप गियर धर्मेश सर म्हणजे सर्व नृत्यप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहेत. खूप मेहनत करून आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर धर्मेश सरांनी यशाची शिखरं गाठली. त्यांच्या या यशात त्यांना पहिल्या पावलापासून साथ दिली ती त्यांच्या वडिलांनी. त्याचे वडील हे त्यांचे खरे आदर्श आहेत. या आठवड्यातल्या 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या भागाची थीम आहे पहिला अनुभव.

स्पर्धक प्रथमेश आणि त्याचा गुरू आकाश यांनी धर्मेश सरांचा पहिला इंटरव्ह्यू आणि त्यांचा एकंदरीत प्रवास दाखवला आहे. त्यात त्यांना त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा पाठिंबा कशा प्रकारे दिला आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा घडत गेला, हे नृत्यातून दाखवलं आहे. या सादरीकरणाच्या शेवटी धर्मेश सरांचे वडील मंचावर आले आणि त्यांना पाहून धर्मेश सर भावुक झाले. धर्मेश सरांसाठी हे एक सरप्राईज होतं. आपल्या मुलाची प्रगती बघून आणि त्याला परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला पाहून त्याचे वडील खूप खूश होते.

त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांची फार इच्छा होती की धर्मेश सरांनी एखाद्या मराठी कार्यक्रमाचं परीक्षण करावं. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' आणि सोनी मराठी वाहिनी यांच्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...