आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलिंगचा परिणाम:गणपतीच्या पुस्तक डेकोरेशनमुळे दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे ट्रोल; मागावी लागली जाहीर माफी, व्हिडिओ पोस्ट करुन म्हणाले...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यामुळे अखेर प्रवीण तरडे यांनी तो फोटो डिलीट करून टाकला आहे.

आज सर्वत्र गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे. सर्वसामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. परंतु, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे. त्यामुळे प्रविण तरडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करुन जाहीर माफी मागितली आहे.

नेमके काय झाले?
प्रविण तरडे यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरच्या गणपतीसाठी त्यांनी पुस्तक गणपती अशी संकल्पना ठेऊन डेकोरेशन केले. गणरायाच्या मूर्तीच्या बाजूला चारही बाजूने त्यांनी पुस्तकं सजवली आहेत. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले. संविधान गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने तरडे हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला? असा जबाबच प्रवीण तरडेंना विचारण्यात आला. प्रविण तरडे यांनी हा मुद्दामहून खोडसाळपणा केला, असा आरोप करत सोशल मीडियातील लोकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

  • व्हिडिओ पोस्ट करुन मागितली माफी

या सर्व प्रकारानंतर प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करुन सगळ्यांची जाहीर माफी मागितली आहे. माझ्या हातून मोठी चुक झाली, हे अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिले. माझ्याकडून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने मी जाहीर माफी मागतो आणि माझी चुक मान्य करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यामुळे अखेर प्रवीण तरडे यांनी तो फोटो डिलीट करून टाकला आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे प्रविण तरडेंवर कारवाई करा अशी मागणी सोशल मीडियावरुन केली जात आहे.