आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. शर्मिष्ठाने एक पोस्ट लिहिल त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांनंतर आता मंदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित खुलासा केला आहे. माझ्यावर सध्या आर्थिक संकट कोसळलंय, असं त्यांनी सांगितलं आहे.
काय आहे मंदार देवस्थळी यांची पोस्ट?
अत्यंत मनापासून केलेल कळकळीचे निवेदन आहे, असे म्हणत मंदार देवस्थळी यांनी लिहिले, “नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे, मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आत्ता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलंय. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो,” असं मंदार देवस्थळी यांनी लिहिलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप केला. तिच्यानंतर 'हे मन बावरे' या मालिकेतील अन्य कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत देवस्थळींवर आरोप केले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या एकाच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
काय आहे शर्मिष्ठा राऊतची पोस्ट?
“गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ,” अशी पोस्ट शर्मिष्ठाने लिहिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.