आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी जाधवांच्या नवीन चित्रपटाची घोषणा:शिवजयंतीनिमित्त ‘बाल शिवाजी’ चित्रपटाची घोषणा, लवकरच सुरु होणार चित्रीकरण; रवी जाधव यांचे दिग्दर्शन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून 2022 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.

बाल शिवाजी’ चित्रपट तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय प्रवास डोळ्यासमोर उभा करेल. शिवजयंतीचे औचित्य साधत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून ‘बाल शिवाजी‘ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचा जीवनप्रवास सोनेरी पडद्यावर रेखाटणार आहेत. इरॉस नाऊ आणि आनंद पंडित मोशन पिक्चरद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

रवी जाधव यांनी या चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'गेली 8 वर्ष जे स्वप्न उराशी बाळगलं… सादर आहे त्याची ही पहिली झलक. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मंगल दिनी इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडीत मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजंड स्टुडिओज सादर करीत आहेत एक भव्य दिव्य मराठी चित्रपट‘बाल शिवाजी’, असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

रवी जाधव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटासाठी त्यांना आठ वर्षांचे संशोधन लागले. 2015 पासून या विषयावर त्यांना चित्रपट बनवायचा होता. जाधव यांनी गेल्या वर्षी निर्माता संदीप सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही कथा सांगितली होती. आता जून 2022 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.

बातम्या आणखी आहेत...