आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले - 'एखादे सुंदर फुलपाखरु होऊन ते छान बागडत असतील'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रवी जाधव यांच्या वडिलांचे 9 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे 9 जानेवारी 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

रवी जाधव यांनी सोशल मीडियावर वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले, ‘आमचे वडील श्री. हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे शनिवार दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या डोंबिवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. या कठीण काळात आम्हा जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या आमच्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

रवी जाधव पुढे म्हणाले, ‘आमचे पप्पा नेहमीच निर्धास्तपणे हसत खेळत रहायचे. आजही ते कासे गावातील श्री देव गजाननाच्या देवळाजवळ एखादे सुंदर फुलपाखरु होऊन छान बागडत असतील.’

बातम्या आणखी आहेत...