आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपकमिंग:दिग्दर्शक साकार राऊत घेऊन येतोय चित्रपट "अजूनी", मराठी चित्रपटात उलगडणार नावीन्यपूर्ण कथा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे.

संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहे. अभिनेता पीयूष रानडे या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पीयूषनं आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र त्याच्यासाठीही अजूनी हा चित्रपट महत्त्वाचा आहे.

चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं हे पोस्टर खूप अर्थपूर्ण आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेच्या अनेक शक्यतांचा अंदाज बांधता येऊ शकतो.

अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. यांनी अजूनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ध्वनि साकार राऊत आणि साकार राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट साकारच्या या पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा ठरणार आहे. मराठी चित्रपटाच्या दृष्टीनेही या चित्रपटाची कथा नवा आयाम ठरू शकेल. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0