आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:दिग्दर्शक विजय केंकरे यांना मातृशोक, नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे निधन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - विजय केंकरे
  • ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांची झोपेतच प्राणज्योत मालवली.

प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या मातोश्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे आज (28 जुलै) निधन झाले. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 86 वर्षांच्या होत्या. ललिता केंकरे यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांतून काम केले. नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या त्या पत्नी होत.

बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणा-या सुधाताई करमरकर आणि ललिता केंकरे या बहिणी होत्या. दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पती गेले गं काठेवाडी' या नाटकात ललिता यांनी भूमिका साकारली होती. दामू केंकरे यांचे 2008 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले होते.